इंदापूर: इंदापूर तालुक्यातील ऊसतोड मजुरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला आहे. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 23 डिसेंबर 2024 ते 10 फेब्रुवारी 2025 या कालावधीत कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखाना व नीरा-भीमा सह. साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील 63 गावांमध्ये 5355 ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
उपक्रमाची वैशिष्ट्ये:
- शेतकऱ्यांच्या बांधावर आरोग्य तपासणी: ऊसतोडणी चालू असलेल्या ठिकाणी जाऊन मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
- गेली पाच वर्षांपासून सुरू: शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टने हा उपक्रम मागील पाच वर्षांपासून सातत्याने राबविला आहे.
- मार्गदर्शन: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीष देसाई, खजिनदार तुषार रंजनकर, विश्वस्त अरविंद गारटकर आणि मार्गदर्शक हमीदभाई आत्तार यांनी या उपक्रमाला मार्गदर्शन केले.
- इंदापूर पॅटर्न: महाराष्ट्रात प्रथमच शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टने असा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने 'इंदापूर पॅटर्न' म्हणून प्रशंसा केली आहे.
- कर्मचाऱ्यांची तपासणी: कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त दोन्ही कारखान्यातील 333 कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
- शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख श्री. महादेव चव्हाण सर यांच्या प्रत्यक्ष सहभागाने सदरील पाच वर्षे उपक्रम कार्यरत.
इतर उपक्रम:
- शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, स्वरूपवर्धिनी आणि अंजली माशेलकर फाउंडेशन यांनी नारायणदास रामदास हायस्कूल आणि महात्मा फुले विद्यालय बिजवडी येथे 'ॲनिमिया मुक्त शाळा' अभियान राबविले. यामध्ये 1038 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
- सहकार्य: दोन्ही कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे आणि सुधीर गेंगे पाटील, प्रमुख शेतकी अधिकारी, कर्मचारी, कृषी सहाय्यक, चीटबॉय यांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.
- शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे इन्चार्ज दिपक जगताप, सागर कांबळे, डॉ. सारंगी कुंभार, नर्स गौरी राठोड, सानिका फुलारी, पुरुष मदतनीस आनंद नलवडे, शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख श्री. महादेव चव्हाण सर आणि शिवाजीराव गोफणे यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
उपक्रमाचा उद्देश:
- ऊसतोड मजुरांच्या आरोग्याची काळजी घेणे.
- त्यांना मोफत औषधोपचार उपलब्ध करून देणे.
या उपक्रमामुळे ऊसतोड मजुरांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.



.jpeg)