इंदापूर, डॉ. संदेश शहा
इंदापूरची सुवर्णकन्या श्रावणी जयश्री प्रशांत शिताप हिने गुजरात गांधीनगर येथे झालेल्या ऑल इंडिया कॅम्प मध्ये कुराश वर्ल्ड चॅम्पियनशिप निवड झाली आहे. तिने निवड चाचणीत हरियाणा, पंजाब व दिल्लीच्या स्पर्धकांना हरविले. त्यामुळे ती जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या कुराश वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव तथा इंटरनॅशनल वन स्टार पंच दत्तात्रय व्यवहारे सर आणि सौ. जयश्री दत्तात्रय व्यवहारे मॅडम यांचे तिला विशेष मार्गदर्शन लाभले. इंदापूर सारख्या निमशहरी ग्रामीण भागात ज्युडो कुराश या खेळासाठी सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू शेकडो खेळाडूंना वेळ प्रसंगी मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना राज्य, राष्ट्रीय पातळी पर्यंत नेण्याचे, त्यांना करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न श्री. व्यवहारे सर, सौ. व्यवहारे मॅडम आणि सर्व सहकारी करत असतात. श्रावणी ही शेतकरी कुटुंबातील असून तिचे वडील हे इंदापूर येथील युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत. शहरातील विविध सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात.
घरात या खेळाची कोणतीही पार्श्वभूमीवर नसताना श्रावणीची आंतरराष्ट्रीय स्तरावर कुराश खेळ स्पर्धेसाठी झालेली निवड ही इंदापूरचा नावलौकिक उंचावणारा आहे. सन २०२४/२५ मध्ये श्रावणी ने राष्ट्रीय स्तरावरील दोन मेडल जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता
जानेवारी २०२६ मध्ये श्रावणीला भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असून ती ५७ किलो गटात कुराश स्पर्धा खेळणार आहे. कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अंकुश नागर, महासचिव शिवाजी साळुंखे यांचे तिला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशामुळे तालुक्यातून व महाराष्ट्रामधील कुराश प्रेमींकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. श्रावणी च्या या यशामुळे तिच्या आई- वडिलांचे व शहा हेल्थ क्लबचा अभिमानाने मानसन्मान उंचावला आहे. या सर्वोच्च कामगिरी बद्दल राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, शहा हेल्थ क्लबचे विश्वस्त भरत शहा यांनी श्रावणीचे अभिनंदन करून तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
