सध्या एक नवीन प्रकारचा फ्रॉड होताना दिसत आहे. Whats App वर एक मेसेज येत आहे कि तुमचा लोन चा हफ्ता भरलेला नाही, लवकरात लवकर हफ्ता भरा. नाहीतर तुमच्या सर्व सपर्काना आम्ही याबाबत कळवू. सोबतच अधिक माहिती साठी लिंक वरून App डाऊनलोड करा असा मेसेज येत आहे. सदरील मेसेज इंग्लिश मध्ये येत आहे.
आता होते काय ज्या व्यक्तीला मेसेज आलेला आहे. ती व्यक्ती कॉल करते आणि म्हणते कि मी लोन घेतलेले नाही. मग स्कॅमर म्हणतात तुम्ही App इंस्टाल करून लॉगीन करा. App मध्ये लॉगीन करते वेळी सदरील App आपल्या contacts चा अक्सेस घेते. सोबतच स्कॅमर आपला Whats App चा DP सुद्धा सेव्ह करून ठेवतात.
त्यानंतर स्कॅमरचे कॉल यायला चालू होतात तुम्ही लोन चा हफ्ता भरा. या प्रसंगी जर सदरील व्यक्ती ने त्यांना पैसे नाही पाठवले तर ते App द्वारे घेतलेल्या सर्व Contacts ना आपला DP ला असलेला फोटो काही AI वेबसाईट द्वारे अश्लील पद्धतीने बनवून पाठविण्याची धमकी दिली जाते. सोबतच आपले कोणते contacts त्यांच्या कडे आहेत हे सांगितले जाते. आत्ता जर कोणी भीतीने पैसे दिले तर ते सतत पैशांची मागणी करत राहतात. अन्यथा विकृत पद्धतीने बनविलेले फोटो सर्वाना पाठविले जातात.
यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय केले पाहिजे.
१. Whats App वर अश्या प्रकारचा मेसेज आला तर त्या मेसेज ला रिप्लाय देऊ नका. तो नंबर लगेच ब्लॉक करून रिपोर्ट करावा.
२. Whats App च्या DP साठी Privacy मध्ये Only Contacts हा पर्याय निवडावा.
३. Whats App वरून आलेल्या कोणत्याही लिंक वरून App डाऊनलोड करू नये. कोणतेही App डाउनलोड करण्यासाठी Play Store चाच वापर करावा.
४. आपला Whats App चा नंबर अश्या फसव्या लोकांना मिळतो कोठून तर आपल्या सोशल मिडिया खात्यांवरून , म्हणून आपले फेसबुक, इन्स्टाग्राम चे खाते हे Lock किंवा Private करून ठेवावे.
५. सोशल मिडिया वर अनोळखी व्यक्तींच्या रिक्वेस्ट स्वीकारू नये.
६. मोफत रिचार्ज साठी येणाऱ्या लिंक ओपन करू नये.
७. अशी काही घटना घडल्यास लगेच जवळील पोलीस स्टेशन मध्ये जाऊन संपर्क साधावा.
