आज वरकुटे पाटी येथे पुणे सोलापूर नॅशनल हायवे च्या सर्विस रोडवर दुचाकी क्रमांक MH12 CP 5386 चा अपघात झाला आहे. सदरील व्यक्ती परराज्यातील असून लोणी एमआयडीसी येथे कामासाठी आलेला आहे. बिजवडी कडून वरकुटे पाटी कडे जात असताना सदरील अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये व्यक्तीच्या चेहऱ्याला जबर मार लागला असून संपूर्ण चेहरा रक्तबंबाळ झालेला आहे. या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नाही. सदर व्यक्तीला जवळील सरकारी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलेले आहे.
सध्या इंदापूर ते लोणी देवकर मधील हायवेचे काम चालू आहे. खूप ठिकाणी रस्त्यावर डांबर निघालेले असून त्या ठिकाणी खडी हंतरण्यात आलेली आहे. परंतु काही ठिकाणी 'काम चालू आहे' असे निर्देशक बोर्ड लावण्यात आलेले नाहीत त्यामुळेच लोकांना पुढे रस्ता खराब आहे याचा अंदाज येत नाही व अपघात होत आहेत असे, उपस्थित नागरिकांचे म्हणणे आहे.
