इंदापूर, २५ फेब्रुवारी २०२५ – शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, अंजनी माशेलकर फाउंडेशन आणि स्व-रूपवर्धिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अॅनिमिया मुक्त शाळा अभियान’ यशस्वीपणे आयोजित करण्यात आले. श्री. नारायणदास रामदास हायस्कूल, इंदापूर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात एकूण ६४३ विद्यार्थ्यांची हेमोग्लोबिन आणि बी.एम.आय. (BMI) चाचणी करण्यात आली.
या उपक्रमाचे आयोजन शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर व विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रक्ताचा एकही थेंब न घेता विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली.
अॅनिमियाचे लवकर निदान आणि प्रतिबंध महत्त्वाचे असून, त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो, असे यावेळी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांचे शैक्षणिक प्रदर्शन अधिक चांगले करण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे ठरतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी स्वरूप वर्धिनीचे कार्यवाह श्री. विश्वास कुलकर्णी, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सोरटे सर, शाळेतील सर्व शिक्षक वर्ग, आरोग्य विभाग केंद्राचे प्रमुख श्री. महादेव चव्हाण, कोपीवरची शाळा प्रमुख श्री. भारत बोराटे, श्री. हमीदभाई अतार, संस्थेची इन्चार्ज श्री. दिपक जगताप तसेच संस्थेचे इतर कर्मचारी उपस्थित होते.



