वरकुटे (इंदापूर): पुणे-सोलापूर महामार्गावरील वरकुटे पाटी ते लोंढे वस्ती दरम्यानच्या परिसरात अज्ञात व्यक्तींकडून चिकन विक्री दुकानांतील कचरा आणि घाण रस्त्याच्या कडेला टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बेवारस कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात:
या परिसरात अज्ञात व्यक्तींकडून रात्रीच्या वेळी चिकन विक्री दुकानांतील कचरा आणि घाण आणून रस्त्याच्या कडेला टाकली जाते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.
प्रशासनाने तातडीने यावर लक्ष घालावे असे नागरिकांचे म्हणणे:
येथून जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. म्हणून प्रशासनाने यावर लक्ष द्यावे असे सर्व नागरिकांचे म्हणणे आहे. जेणेकरून येथे कोणी कचरा टाकणार नाही.
