इंदापूर: वासंती श्यामसुंदर जावडेकर मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे विश्वस्त श्री. पद्माकर जावडेकर यांच्या प्रेरणेने गुरुवर्य शंकरराव जावडेकर पुस्तक वितरण समारंभ जि. प. प्रा. शाळा, पारेकरवस्ती येथे गट शिक्षणाधिकारी श्री अजिंक्य खरात केंद्रप्रमुख रविंद्र सातव, श्री. अरविंद गारटकर, श्री. हमीदभाई आत्तार , लेखक व कवी श्री. महादेव चव्हाण, श्री. भारत बोराटे यांचे शुभ हस्ते पुस्तकांचे व खाऊचे वाटप करण्यात आले . विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे आणि शैक्षणिक प्रगतीला चालना देणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
. आपल्या मनोगतात खरात साहेबांनी सांगितले की, "वाचन हे मुलांच्या व्यक्तिमत्व घडविण्यात मोलाची भूमिका बजावते. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर वाचनाच्या सवयीमुळे ज्ञानवृद्धी होऊन विद्यार्थी अधिक सक्षम होतात."
ट्रस्टचे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांनी वाचन संस्कृती जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. त्यांनी नमूद केले की, "वाचनामुळे सृजनशीलता, चिंतनशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थी पुस्तकांशी मैत्री करणार असल्यास ते निश्चितच उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम ठरतील." तसेच ट्रस्टच्या माध्यमातून भविष्यात विद्यार्थ्यांना आणखी मदत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष घोडके सहशिक्षिका सविता पवार अश्विनी पारेकर, रुपाली पारेकर शाळा व्यवस्थापन अध्यक्षा सुनिता पारेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टिकोन अधिक व्यापक करता येईल आणि त्यांची ज्ञानवृद्धी होईल. या कार्यक्रमावेळी ॲड. अनिल पारेकर, सागर कांबळे, केदार गोसावी, शिवाजी गोफणे उपस्थित होते . मुख्याध्यापकांनी अशा समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले आणि भविष्यात अशा उपक्रमांचे सातत्य ठेवण्याचे आवाहन केले.

