इंदापूर, दि. २२: ज्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात त्यांनी पहिलीच्या वर्गात अक्षरओळख केली, त्याच शाळेत वयाच्या ९० व्या वर्षी जाऊन ज्येष्ठ कवयित्री आणि गुरुवर्या आदरणीय श्रीमती प्रतिभाताई गारटकर यांनी अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला. शाळा क्रमांक २ मध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी लहान मुलांचा वर्ग घेतला आणि त्यांना पुस्तके व खाऊचे वाटप केले. आपल्या शिक्षण संस्थेप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि प्रेम पाहून शालेय विद्यार्थी व शिक्षकवर्ग भावुक झाला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य अरविंद गारटकर उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख सी. ना. चव्हाण यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. कृष्णा ताटे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी प्रतिभाताई गारटकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी शाळा क्रमांक १ च्या मुख्याध्यापिका सौ. मंदाकिनी बोराटे आणि शाळा क्रमांक २ च्या मुख्याध्यापिका सौ. जाई कोळेकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार, लेखक महादेव चव्हाण सर, संतोष जामदार, अशोक ननवरे, रघुनाथ खरवडे, धरमचंद लोढा, सचिन चौगुले, शिक्षिका रजिया शेख, भारती पौळकर, मनिषा मोटे, ज्योती पवर, वैशाली वर्तले, पुष्पा दळवी, श्री कृष्णा शिंदे, दत्तात्रय वारे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मनोगतात प्रतिभाताई गारटकर यांनी आपल्या शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले आणि विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करण्याचा संदेश दिला. ९० व्या वर्षीही त्यांचा उत्साह आणि सकारात्मक दृष्टिकोन पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर प्रतिभाताई गारटकर यांच्या हस्ते शाळेतील सुमारे ३५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तके आणि खाऊचे वाटप करण्यात आले. लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून प्रतिभाताईंच्या चेहऱ्यावरही समाधानाचे हास्य झळकले.

.jpeg)

.jpeg)

