इंदापूर: नुकत्याच दहावीच्या परीक्षा पार पडल्यानंतर मिळणाऱ्या दीर्घ सुट्टीचा सदुपयोग करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. भविष्यातील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीस उपयुक्त ठरणाऱ्या MS-CIT (महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान परीक्षा) कोर्सकडे विद्यार्थ्यांचा मोठा ओघ बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, इंदापूर शहरातील नामांकित अल्फा बाईट कॉम्प्युटर्स या संस्थेने आजपासून MS-CIT च्या विशेष उन्हाळी बॅचचा मोठ्या उत्साहात शुभारंभ केला.
MS-CIT चे अनेक वर्षांपासून सुरु असलेले इंदापुरातील पहिले संगणक प्रशिक्षण केंद्र अल्फा बाईट कॉम्प्युटर्स चे संचालक श्री. तुषार रंजनकर यांनी इंदापूर गौरवगाथा शी बोलताना सांगितले कि, "आजकाल प्रत्येक क्षेत्रात कॉम्प्युटर आणि माहिती तंत्रज्ञानाचे महत्त्व अनमोल आहे. MS-CIT चा कोर्स विद्यार्थ्यांना मूलभूत संगणक कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करतो, ज्यामुळे त्यांना पुढील शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होते. तसेच, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विविध टूल्स च्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची विचार करण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता अधिक विकसित होईल."
अल्फा बाईट कॉम्प्युटर्स हि संस्था विद्यार्थ्यांना नेहमीच उत्तम गुणवत्तेचे प्रशिक्षण देते. MS-CIT च्या या विशेष उन्हाळी बॅचमध्ये विद्यार्थ्यांना अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित प्रशिक्षण दिले जाते. यासोबतच, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातील महत्त्वाचे घटक असणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या विविध टूल्सची ओळख आणि त्याचे उत्कृष्ट प्रशिक्षण देण्यावर संस्थेचा भर असतो."
आजच्या डिजिटल युगात सक्षम नागरिक बनण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कौशल्ये MS-CIT कोर्समध्ये समाविष्ट आहेत. केवळ एवढेच नव्हे, तर हा कोर्स राज्य शासनाच्या अनेक नोकरी भरती प्रक्रियेसाठी अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स एक महत्त्वपूर्ण संधी ठरत आहे.
अल्फा बाईट कॉम्प्युटर्सने नेहमीच विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे आणि या विशेष उन्हाळी बॅचच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा संस्थेचा मानस आहे. या बॅचमध्ये अनुभवी आणि कुशल प्रशिक्षकांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे, तसेच विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिकण्याची संधी मिळेल.
दहावीची परीक्षा दिलेल्या आणि आपल्या भविष्यातील वाटचालीस एक योग्य दिशा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अल्फा बाईट कॉम्प्युटर्समधील MS-CIT ची ही विशेष उन्हाळी बॅच नक्कीच एक उत्तम पर्याय ठरू शकते. या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थी केवळ संगणक साक्षरच होणार नाहीत, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मूलभूत ज्ञानामुळे ते तंत्रज्ञानाच्या प्रगतीशीही जोडले जातील. संस्थेने या बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून, इच्छुक विद्यार्थी त्वरित संपर्क साधू शकतात.
इंदापूर मध्ये सध्या अल्फा बाईट म्हणजे MS-CIT आणि MS-CIT म्हणजेच अल्फा बाईट असे समीकरण पाहायला मिळत आहे.

