कर्मयोगी शंकररावजी पाटील (भाऊ) आणि कै. लीलाताई पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून, इंदापूर तालुक्यात समाजसेवेचा वसा ताईंनी समर्थपणे हाती घेतला.
इंदापूर
तालुक्याच्या विकासाच्या इतिहासात कर्मयोगी शंकरराव पाटील उर्फ भाऊ यांचे नाव
आदराने घेतले जाते. त्यांच्या कार्यात खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी
दिवंगत लीलाताई पाटील यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. या जोडप्याच्या
कार्यामुळे इंदापूर तालुक्याने शेती, सहकार आणि शिक्षण
यांसारख्या अनेक क्षेत्रांत लक्षणीय प्रगती केली.
शंकरराव पाटील यांचा वारसा :
"तव स्मरण सतत स्फूर्तीदायी आम्हा घडो, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही पुढे चालवू पुढे हा वारसा" या वचनाप्रमाणे, भाऊंच्या कन्या श्रीमती पद्माताई भोसले यांनी त्यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला आहे. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या उपाध्यक्षा आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत.
श्रीमती पद्माताई भोसले यांचे समाजकार्य :
श्रीमती पद्माताई भोसले यांनी 2015 मध्ये शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी आणि महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
श्रीमती पद्मा ताई यांच्या मार्गदर्शनाने शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत राबविले जाणारे उल्लेखनीय उपक्रम :
शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र :
· ऊसतोड मजुरांसाठी सुरू केलेले हे आरोग्य केंद्र आहे.
· या केंद्रातून ऊसतोड मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार केले जातात.
· गेल्या ५ वर्षांपासून सदरील उपक्रम चालू असून या मार्फत ३५००० पेक्षाही जास्त मजुरांना मोफत उपचाराचा लाभ मिळालेला आहे.
· या केंद्रामार्फत ऊसतोड मजूर, त्यांच्या कुटुंबातील महिला, मुलांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार जेथे ऊस तोड चालू आहे, त्याठिकाणी जाऊन केले जातात.
· सदरील उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 'मॉडेल प्रोजेक्ट' ठरला आहे.
कोपिवरील शाळा-अभ्यासवर्ग :
· ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी सुरू केलेला हा अभिनव उपक्रम आहे.
· या अभ्यासवर्गांमध्ये आत्ता पर्यंत २८० विद्यार्थ्यांनी अक्षर ओळख, अभ्यास, खेळ आणि गाणी यांचे शिक्षण घेतले आहे.
· ऊसतोड मजुरांच्या मुलांना मुलींना अक्षर ओळख व्हावी, शिक्षणाची गोडी लागावी, हा उद्देश ताईंचा होता.
· या विद्यार्थ्यांनी शाळेत यावे शिक्षण घ्यावे म्हणून त्यांना मोफत गणवेश वाटप, शैक्षणिक साहित्य, दररोजचा खाऊ वाटप, त्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून गॅदरिंग सारखा उपक्रम मुलांसाठी ताईंनी राबवला.
शंकरराव पाटील अक्षय्य शिक्षण योजना :
· कोरोना काळात अनाथ झालेल्या तसेच गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली ही योजना आहे.
· या योजनेतून गरजू विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते.
· या मध्ये ५७७ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले असून २०० पेक्षा जास्त विद्यार्थी उत्तम प्रकारे अर्थार्जन करत आहेत.
· या योजनेमार्फत गरजू व होतकरू विद्यार्थी-विद्यार्थिनी व महिला यांना विविध रोजगारभिमुख कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
महिला सक्षमीकरण :
· श्रीमती पद्माताई भोसले यांनी आर्थिक दुर्बल घटकातील 5000 जास्त महिलांना मोफत प्रशिक्षण दिले आहे, तसेच 1500 महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.
· प्रशिक्षण घेतलेल्या महिला चांगल्या प्रकारे अर्थार्जन करत आहेत.
· श्रीमती पद्माताई भोसले यांनी महिलांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी संस्थेमार्फत गारमेंट प्रोडक्शन युनिटच्या माध्यमातून 50 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला.
· तसेच, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना, सारथी कौशल्य विकास योजना आणि जावेद हेअर अँड ब्युटी अकॅडमी यांच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण दिले आहे.
· महिलांना उत्तम दर्जाचे विविध कौशल्यांचे प्रशिक्षण मिळावे म्हणून उन्मेष कौशल्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
· श्रीमती पद्माताई भोसले यांनी आत्तापर्यंत आर्थिक दुर्बल घटकातील 5000 महिलांना मोफत प्रशिक्षण तसेच 1500 महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली असून आज त्या इंदापूर तालुक्यात व परिसरात महिला सक्षमीकरणातील 'माईल स्टोन ठरल्या आहेत.
संस्थेमार्फत राबविण्यात येणारे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम :
· विद्यार्थ्यांना 'कमवा आणि शिका' योजनेअंतर्गत निवास, जेवण आणि शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.
· विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन आणि नोकरीच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जातात.
· ओजस बाल संस्कार वर्ग मार्फत विद्यार्थ्यांना मोफत विविध जीवनोपयोगी मूल्य शिकवली जातात. तसेच त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला जातो.
· त्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते.
श्रीमती पद्माताई भोसले यांनी आपल्या वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला आहे. त्यांचे समाजकार्य महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे.
- - श्री. महादेव चव्हाण
प्रसिध्द लेखक, कवी व समाजसेवक
