इंदापूर: इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने आज (४ मार्च २०२५) महावितरण कार्यालयात जाऊन वायरमन डे उत्साहात साजरा केला. यावेळी अहोरात्र नागरिकांना वीजपुरवठा करणाऱ्या वायरमन आणि इतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सकाळी ११.३० वाजता महावितरण कार्यालयात कार्यक्रमाला सुरुवात झाली. लाइनमन राहुल पळसे, महेश टफले, फारुख शेख, दत्तात्रेय देवकर यांचा सत्कार करण्यात आला. वीज वितरण अधिकारी प्रमोद कुमार जाधव, उप कार्यकारी अभियंता गणेश जाधव, उत्तम गायकवाड, शिपाई सतीश बनसोडे आणि दीपक चौगुले यांचाही सत्कार करण्यात आला. इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने सर्वांना हार, गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले.
या कार्यक्रमासाठी प्रा. कृष्णा ताटे सर (प्रमुख, इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती), हमीदभाई आत्तार (मार्गदर्शक, इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती), महादेव चव्हाण सर (संघर्ष समिती पदाधिकारी), नगरसेवक अमर गाडे, भारत बोराटे, अस्लम बागवान, माऊली राऊत तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना अहोरात्र वर्षभर वीजेची सेवा देणाऱ्या कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.


