आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. राज्मंयांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतला आहे. काही कालावधी पूर्वी मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितल्याची चर्चा होत आहे. राजनामा बाबत फडणवीसांकडुन विधीमंडळात अधिकृत घोषणा केलेली आहे. मी देशमुखांच्या आई ची माफी मागते, राजनामा आधीच द्यायला हवा होता असे पंकजा मुंडे यांनी म्हणाले आहे. अखेर दोन महिन्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा: फडणवीस सरकार मधला पहिला राजीनामा
By -
मार्च ०४, २०२५

