दि . १० जून २०२५ मंगळवार : वट पोर्णिमा भारतीय संस्कृतीतील महत्वाचा सण .या दिवशी वडाचे झाडाचे पुजन करून जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी स्थळी येथे सौभाग्यवतींना वडाचे रोप भेट देण्यात आले. भेट दिलेल्या वडाच्या झाडांचे रोप श्री व सौ यांनी त्याच ठिकाणी उभयतांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले असा जोडीने मिळून वटपोर्णिमेच्या दिवशी झाड लावण्याचा पहिल्याच आगळा वेगळा उपक्रम करण्याचा उपक्रम वृक्षसंजिनी परिवाराच्या सायराभाभी आत्तार यांचे सकल्पनेतून घेण्यात आला त्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे .
यावेळी सायराभाभी आत्तार यांनी सांगितले कि श्रद्धा आणि विज्ञान यांचा संगम प्रत्येक सणामागे असतो त्याच प्रमाणे सामाजिक ,वैज्ञानिक आणि धार्मिक विचार सुद्धा असतात . वटपोर्णिमेला विवाहीत स्त्रीया आपल्या पतीच्या दिर्घायुष्या साठी प्रार्थना करत वडाच्या झाडाची पुजा करतात व वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात परंतु यामधे एक वैज्ञानिक दृष्टीकोन दडलेला असतो यामुळे आपण निसर्गाशी जोडले जातो . वडाचे झाड हे दिवस रात्र ऑक्सीजन सोडते म्हणून झाडाभोवती प्रदिक्षणा मारली कि आपण निसर्गाच्या सानिध्यात गेल्या सारखे वाटून आपोआप मनःशांती मिळते . माणसांचा श्वास असणारा वृक्ष म्हणून या झाडाला महत्व आहे .
यावेळी आजरेकर फडाचे प्रमूख हभप श्री हरिभाऊ बोराटे ( काका माऊली) दत्तात्रय गुजर सर, ॲड राकेश शुक्ल, ॲड .आनंद केकान, ॲड . आशुतोष भोसले, ॲड वृषी मेणसे , कुशल कोकाटे , संजिवनी परिवाराच्या सायराभाभी आत्तार ,
चंद्रकांत देवकर, सचिन पवार, अशोक चिंचकर,हमीद आत्तार, नागरिक व महिला वर्ग उपस्थित होता .
