इंदापूर – आंतरराष्ट्रीय योग दिन (२१ जून) निमित्त शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूर येथे ट्रस्ट च्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री.तुषार रंजनकर, विश्वस्त श्री.अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संस्थेतील विद्यार्थिनींना योगासनाचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच योगाबाबत जनजागृतीही करण्यात आली.
कार्यक्रमामध्ये पतंजली योग समितीच्या प्रशिक्षिका सौ. अर्चना शेवाळे मॅडम आणि सौ. राजशी शिंदे मॅडम मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थिनींना विविध योगासने, प्राणायाम व त्याचे शारीरिक-मानसिक फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली. उपस्थित सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या ब्यूटी विभाग प्रमुख सौ. रोहिणी जाधव, फॅशन विभागाचे सहाय्यक सौ. मंदा ढावरे तसेच संस्थेचे सर्व विद्यार्थिनी उपस्थित होते .
योग ही भारताची प्राचीन देणगी असून, त्याद्वारे निरोगी जीवनाची वाटचाल शक्य आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.

