पुणे 09 जूलै 2025 : रोजी कृषी आयुक्तालय येथे खरीप हंगाम 2025 मधील प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2025 आयोजित आढावा बैठकीमध्ये 'प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या भित्तिपत्रिकाचे अनावरण मा संचालक विनयकुमार आवटे सर आणि मा मुख्य सांख्यिक वैभव तांबे सर भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी श्री.विकास राखुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बैठकीला कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सुधारित पिक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती माननीय संचालक व मुख्य सांख्यिक यांनी यावेळी केली. तसेच पिक विमा प्रतिनिधींनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांना योजनेविषयी माहिती द्यावी. तसेच पिक विमा काढण्यात सुद्धा मदत करावी अशा सूचना देखील देण्यात आल्या.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेबद्दल शेतकऱ्यांचे असलेले गैरसमज दूर करण्यामध्ये सर्वांनी आपले योगदान द्यावे असे देखील त्यांनी यावेळी प्रतिपादन केले. तसेच यावर्षी महाराष्ट्र शासनातर्फे सुधारित पिक विमा योजनेमध्ये अत्यंत चांगले बदल केले असून ते शेतकऱ्यांच्या हिताचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
