इंदापूर, १५ जुलै २०२५: शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूर यांच्या वतीने आज जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त 'उन्मेष कौशल्य महोत्सव २०२५' ची अधिकृत घोषणा करण्यात आली. मागील वर्षीच्या महोत्सवाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर, यंदा हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात सादर केला जात आहे. हा महोत्सव ५ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत होणार असून, इंदापूर व परिसरातील युवक-युवतीं, विद्यार्थी,कौशल्य शिकू इच्छिणारे नागरिक, व्यावसायिक यांना अल्प दरात व्यावसायिक आणि रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्याचा उद्देश आहे.
संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर व विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये एकूण ३२ हून अधिक कार्यशाळांचा समावेश असून, सर्व कार्यशाळा प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पद्धतीने शिकवल्या जाणार आहेत. जावेद हबीब हेअर अँड ब्युटी विभाग या विभागात हेअर कट (बेसिक व अॅडव्हान्स), ब्युटी, हायड्रा फेशियल, टॅन, नेल आर्ट, नेल एक्स्टेंशन, हेअर एक्स्टेंशन, केमिकल कोर्स, मेहंदी, मेकअप आणि हेअर स्टाइलिंग यांसारख्या कोर्सेसचा समावेश आहे. या कोर्सेसची फी ₹२९९ ते ₹५९९ दरम्यान असून, प्रत्येक प्रशिक्षणाच्या शेवटी प्रमाणपत्र दिले जाईल.
फॅशन डिझायनिंग विभाग यामध्ये प्लाझो पॅन्ट, हँड स्टिचिंग, प्रिन्स कट ब्लाउज, सिगार पॅन्ट, पटियाला पॅन्ट, कटोरी ब्लाउज, पंजाबी ड्रेस, बलून पॅन्ट, बेलबॉटम पॅन्ट आणि फोरसाइड ब्लाउज अशा विविध प्रशिक्षण कार्यशाळा असतील. याशिवाय, केक मेकिंग, नथ मेकिंग, बेसिक ज्वेलरी मेकिंग आणि अरी वर्क यांसारखी कौशल्ये देखील शिकवली जातील. तांत्रिक क्षेत्रात रुची असणाऱ्यांसाठी संगणक व डिजिटल विभागातील कोर्सेस आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतील. यात कॉमर्स विथ कॉम्प्युटर, डिजिटल लिटरसी, मोबाईलचा प्रभावी वापर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायबर सिक्युरिटी यांचा समावेश आहे. हे कोर्सेस केवळ ₹४९ ते ₹९९ इतक्या नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत, जेणेकरून गरीब आणि ग्रामीण भागातील युवकांनाही ते सहज परवडतील.
'स्किल स्टार' गौरव आणि नोंदणी
ट्रस्टतर्फे असे सांगण्यात येत आहे की, “आजच्या काळात युवकांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित शिक्षणाकडे वळणे गरजेचे आहे. उन्मेष महोत्सव हे व्यासपीठ त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारे आणि प्रेरणादायी आहे.” प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाणार असून, उत्कृष्ट सहभागासाठी ‘स्किल स्टार’ गौरव देखील जाहीर करण्यात येणार आहे.
या कौशल्य महोत्सवात सहभागी होऊन युवकांनी स्वतःच्या आयुष्याला नवी दिशा द्यावी, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. ट्रस्टच्या कार्यालयात किंवा ऑनलाइन नावनोंदणीसाठी संपर्क क्रमांक:
9822474545 / 8208687592 / 9689827118

