इंदापूर, (३० जुलै २०२५): आज, बुधवार, ३० जुलै २०२५ रोजी इंदापूर शहरातील कैलास भूमी, यशवंत नगर, शहा रोड येथे वृक्ष संजीवनी परिवार आणि वीरशैव लिंगायत समाज यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण मासानिमित्त २५ विविध प्रकारच्या देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. दुपारी ३:३० वाजता हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी वीरशैव लिंगायत समाजाचे गुरु राचलिंग स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी श्री. गजानन निलाखे, प्रा. कृष्णा ताटे, माजी नगरसेवक श्री. अतुलकुमार ढोले, श्री. नागेश भंडारी, श्री. महेश भिंगे, प्रा. सदाशिव उंबरदंड, हमीद आत्तार, चंद्रकांत देवकर, अशोक अनपट, अशोक चिंचकर, पतंजली योग समितीचे प्रशांत गिड्डे, श्री. सुनील भंडारी, अशोक खेडकर, भारत बोराटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वृक्ष संजीवनी परिवाराच्या संयोजिका सायरा आत्तार, रश्मी निलाखे, सविता निलाखे, अंजू ढोले, राजश्री उंबरदंड, सुलभा टाकणखार, स्वाती भंडारी या महिला भगिनींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला वीरशैव लिंगायत समाजाचे बांधव आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, ज्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडले.

.jpeg)