आज वार गुरुवार दिनांक 31/7/2025 रोजी सकाळी 10.30 ते 4.00 वाजेपर्यंत अवसरी केंद्रातील, एकूण 14 शाळांमध्ये गुरुवर्य शंकरराव जावडेकर यांच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना गोष्टीची, थोर नेत्यांची, समाज सुधारक, अशी विविध पुस्तके मोफत वाटप करण्यात आले त्याबरोबर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला . गुरुवर्य शंकरराव जावडेकर यांचे योगदान शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे आहे. पूर्वीच्या काळी प्राथमिक शिक्षकाला तुटपुंज्या पगारात काम करावे लागत होते. ही गरज ओळखून त्यांनी शिक्षकांसाठी प्राथमिक शिक्षकांची सोसायटी स्थापन केली. तारेच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांनी शिक्षकाचे काम केले. त्यांचे नातू पद्माकर जावडेकर यांच्या सहकार्याने पुस्तकाचे खाऊचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.जि .प. प्राथमीक शाळा गलांडवाडी नंबर .2, बेडशिंगे, भाटनिमगाव, अवसरी, वडापुरी, शिंदे वस्ती, वडाचे लवण, पिंगळे वस्ती, यादव वस्ती, राखुंडे मळा, तोबरे वस्ती, पंधारवाडी , राऊतवाडी, रामवाडी,या शाळेमध्ये इंदापूरचे समाज सुधारक शिक्षण पितामह गुरुवर्य शंकरराव जावडेकर यांच्या स्मरणार्थ शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तक आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता .
त्यावेळी उपस्थित अवसरी केंद्राचे प्रमुख माननीय श्री सुरेश साळुंखे साहेब तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि सहशिक्षक हिरे उमाकांत, भगत प्रताप, योगीराज गाडेकर, महादेव गायकवाड, सौ मनीषा मोरे, सावता भोग, सत्यवान भोसले, उपमन्यू नवले, सौ शोभा कदम, जाधव सर, लोखंडे सर, गायकवाड सर, कांबळे सर खंदारे सर, मरळ सर, हरिभाऊ कदम, सौ वाळुंजकर मॅडम यादव सर, सौ प्रतिभा खाडे, श्याम सुंदर माने, सौ उल्का शिंगाडे, नागनाथ वाजरवाडे, गजानन जाधव, मखरे शशिकांत, हे सर्व शिक्षक कार्यक्रमास उपस्थित होते. उपक्रमाचे प्रमुख प्राचार्य अरविंद गारटकर सर, लेखक महादेव चव्हाण सर, सेवानिवृत्त शिक्षक श्री भारत बोराटे सर, सामाजिक कार्यकर्ते हमीद भाई आतार, हनुमंत गोफणे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.


