इंदापूर. रविवार दिनांक 20 जुलै 2025 रोजी इंदापूर येथे माऊली हरित अभियान व बायोस्पिअर संस्था पुणे यांच्या वतीने ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठ गमन सोहळ्याचे औचित्य साधून पालखी सोहळा पहिल्यांदाच श्री क्षेत्र आळंदीत माऊलींच्या भेटीला येत असल्याचा सुवर्ण योगावर जगदगुरु संत तुकाराम पालखी तळावरती अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ नांदृकवृक्ष यांचे रोपण करण्यात आले याप्रसंगी बोलताना माऊली हरित अभियानाचे प्रमुख डॉ .सचिन पुणेकर म्हणाले की वृक्ष संजीवनी परिवाराने हा परिसर पूर्ण हिरवा गार केला असून गेल्या चार वर्षापासून वृक्ष संगोपन केले आहे त्यामुळे या पालखीतळावरील वृक्ष चांगल्या प्रकारे वाढले असून वृक्षांची संख्या ही भरपूर आहे काही वृक्ष तर दहा फुटापर्यंत वाढले आहे हे पाहून आनंद झाला त्यांच्या या कामाची दखल घेऊन आम्ही माऊली हरित व बायोस्फियर संस्था यांच्या वतीने या संस्थेचे प्रमुख व सर्व सदस्य यांना पारितोषिक देत आहोत तसेच गेली दहा वर्ष पालखीतील वारकऱ्यांची चरण सेवा करणाऱ्या जय इन्स्टिट्यूट ऑफ नरसिंह प्रमुख लताताई नायकुडे आणि त्यांच्या 300 पेक्षा अधिक मुलींनी ज्ञानेश्वर माऊली पालखी आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तील वारकऱ्यांचे देहू ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर अशी सेवा केली व या सेवेचे फळ म्हणून त्यांच्या कामाची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशी दिवशी पंढरपूर या ठिकाणी त्यांचा जाहीर सत्कार केला म्हणून आमच्या संस्थेच्या वतीने त्यांचाही नागरी सन्मान करण्यात येत आहे अशा प्रकारचे समाजकार्य करणाऱ्या महिलांचे कर्तुत्व पाहून समाजामध्ये अभिमान व्यक्त केला जातो याप्रसंगी त्यांच्या समवेत आलेले दत्तात्रय गायकवाड आणि शैलेंद्र पटेल यांचीही भाषणे झाली .
या कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम मंदिर येथील मंदिरामधून सदर रोपांची पालखीमध्ये बैठक करून दिंडी काढण्यात आली होती दिंडीमध्ये 500 पेक्षा जास्त इंदापूरकर सहभागी झाले होते याप्रसंगी बोलताना प्रा . कृष्णा ताटे यांनी प्रास्ताविकामध्ये सर्वांचे स्वागत करून इंदापूर मध्ये वृक्ष संजीवनी परिवाराने केलेल्या कार्यामुळे इंदापूर हे पर्यावरण पूरक बनत असून नांदुरु अजानवृक्ष सुवर्ण पिंपळ या वृक्षामुळे आळंदीतील ज्ञानेश्वर माऊली येथील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अंश इंदापूर मध्ये उतरला असून भविष्य काळामध्ये इंदापूरकर नागरिकांनी या वृक्षांना प्रदक्षणा करीत असताना त्यांना देहू आळंदी पंढरपूर येथे दर्शन घेत असल्याची अनुभुती येईल .
आळंदी ते पंढरपूर तसेच जय नर्सिंग इन्स्टिट्यूटने केलेल्या कार्याचा गौरव त्यांनी आपल्या भाषणात केला
या सर्व कार्यक्रमांमध्ये हमीदभाई आत्तार, ॲड , आनंद केकान, प्रशांत सिताप, चंद्रकांत देवकर, संतोष जामदार, भारत बोराटे, अशोक ननवरे, सफल घासकाटू , रामेश्वर साठे, प्रशांत गिड्डे, रविंद्र परबत, शरद झोळ डॉ सुदिप ओहोळ,किसन पवार, देवराम मते, असलम शेख, ज्ञानदेव शिंदे, सुहास जौंजाळ, बोंगाणे सर नामवंत कीर्तनकार मगर महाराज ओंकार महाराज जौंजाळ शेषांदर बोबडे महाराज मीनीनाथ महाराज कुंभार, दिनेश महाराज गायकवाड इत्यादी कीर्तनकार माजी नगराध्यक्षा अलकाताई ताटे, लताताई नायकुडे, प्रा .जयश्री सरवदे मॅडम , स्वाती अधटराव, लता नागपुरे, रोहीणी जौंजाळ, वर्षा गाढवे, मीना वेदपाठक श्यामल घासकाटू सहभागी झाले होते.

