या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आदिवासी समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ज्यामध्ये विदर्भातील श्री. एम आर मावस्कर सह्यायक प्रकल्प अधिकारी धारनी यांनी शासनाच्या अनेक सेवा आदिवासी लोकांपर्यंत पोहोचवल्या त्यानिमित्त त्यांना मेळघाट सुपरस्टार पुरस्कार. श्री. शिवकुमार बायस यांनी विदर्भातील शेकडो आदिवासी तरुणांना पुणे-मुंबई येथे रोजगार देऊन स्वालंबी बनवले त्यामुळे त्यांना यशस्वी ऊद्योजक पुरस्कार, समाजसेवक श्री. योगपाल भिमराव लबडे यांनी शेकडो बाटल्या रक्त रक्तपेढीसाठी संकलित केले, तसेच कोरोना काळात आदिवासी बांधवाना शेकडो टन धान्य वाटप केले त्यामुळे त्यांना विदर्भ भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले . त्याच बरोबर जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग या संस्थेस त्यांच्या आदिवासी समाजातील तरुण तरुणींच्या विकासासाठी केलेल्या कार्याबद्दल आदिवासी भूषण पुरस्कार सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यातून सामाजिक बांधिलकी आणि कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला.
हा कार्यक्रम केवळ एक सोहळा नसून, सामाजिक एकोपा, विविध संस्कृतींचा आदर आणि विशेषतः युवकांमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्याचे एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरले. शिस्तबद्ध नियोजन आणि उत्स्फूर्त सहभागामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या सौ.लता नायकुडे, सौ.उर्मिला नायकुडे, श्री.ऋषिकेश नायकुडे, सौ.मखरे मॅडम व सर्व स्टाफ ने विशेष प्रयत्न केले. कु.ईश्वरी, ची.संग्राम नायकुडे यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाने सर्वाना मंत्रमुग्ध केले.
या प्रेरणादायी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष रो. प्रदीपदादा गारटकर, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ चे लिटरसी डायरेक्टर रो. वसंतराव मालुंजकर, जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अध्यक्ष श्री. जयंत नायकुडे सर, युवा क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रो. प्रशांतदादा शिताप आणि रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेन्ट्रलचे अध्यक्ष रो. ज्ञानदेव डोंबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याचबरोबर कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य दत्तात्रय भरणे मामा यांचे चिरंजीव श्रीराज दत्तात्रय भरणे, इंदापूर चे माजी नगराध्यक्ष मा.प्रा.कृष्णा ताटे, त्याच बरोबर रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेन्ट्रल चे सदस्य रो.समीर सूर्यवंशी, रो.महादेव दादा काळे,रो.अप्पासाहेब बंडगर, रो.मोरेश्वर कोकरे,रो.चंद्रकांत तरंगे, रो.मंदाकिनी डोंबाळे व जयहिंद आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, वृक्ष संजीवनी परिवार चे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेन्ट्रलचे अध्यक्ष रो. ज्ञानदेव डोंबाळे यांनी केले.
