कालठण: येथील कै. लक्ष्मीबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित दोन दिवसीय धार्मिक पर्यटन यात्रा नुकतीच उत्साहात पार पडली. या यात्रेत कालठण क्रमांक एक येथील 34 महिला आणि 8 पुरुषांसह एकूण 42 भाविकांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या विशेष बससेवेचा लाभ घेत या भाविकांनी विविध धार्मिक स्थळांना भेट दिली.
या यात्रेदरम्यान भाविकांनी यारमाळ येथील येडेश्वरी, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, नामदेव हिंगोली, शेगाव आणि गुलाब बाबा या तीर्थस्थळांचे दर्शन घेतले. दोन दिवसांच्या या प्रवासात परळी वैजनाथ, औंढा नागनाथ आणि नामदेव हिंगोली येथील पुरातन मंदिरांमधील अप्रतिम कलाकुसर पाहण्याची संधी भाविकांना मिळाली. अल्पकाळात प्रसिद्ध झालेल्या गुलाब बाबा येथील मठात भाविकांना महाप्रसादाचा लाभही मिळाला.
या धार्मिक यात्रेत सौ. राणी क्षीरसागर, गोजर जगताप, भागाबाई जावळे, कमल पाडुळे, अलका खंबाले, शोभा शिंदे, जयश्री करे, शैला नरुटे, संगीता बनसोडे, सिता जाधव, लता करे, लता गटकुळ, संगीता शेंडगे, सुशीला पावने, धोंडाबाई करे, द्रुपदा करे, अंजना बनसोडे, सिंधु बनसोडे, नागर नरुटे आणि छाया करे या महिला भाविकांसह बाळासाहेब जगताप, ज्ञानदेव शिंदे, अर्जुन कुंभार, साहेबराव सपकळ आणि मारुती करे या पुरुषांनी सहभाग घेतला होता.
या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी नितीन क्षीरसागर यांनी विशेष प्रयत्न केले. यात्रेच्या नियोजनासाठी आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी, सहाय्यक वाहतूक अधीक्षक संजय वायदंडे, श्री. दत्तात्रेय भोसले, वाहतूक नियंत्रक विक्रम चंदनशिवे, भीमराव शिंगाडे, शंकर कोरटकर तसेच विशाल रंनवरे यांनी सहकार्य केले. यात्रेच्या बससेवेसाठी चालक विवेक पोरे आणि नंदकुमार दळवी यांनी विशेष परिश्रम घेतले.
यात्रेकरूंनी दिलेल्या सहकार्यामुळे हा धार्मिक सोहळा निर्विघ्नपणे पार पडला, अशी माहिती संयोजकांनी दिली.
