पुणे (इंदापूर): मुस्लिम धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानली जाणारी उमराह यात्रा करण्यासाठी इंदापूर शहरातून सामाजिक कार्यकर्ते हमीद नबीलाल आत्तार, त्यांच्या पत्नी सायराबी आत्तार आणि कन्या सानिया आत्तार हे मक्का-मदीना येथे रवाना होणार आहेत. त्यांच्या या धार्मिक यात्रेनिमित्त इंदापूरवासियांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
उमरा यात्रेला 'छोटा हज' असेही म्हणतात. ही यात्रा पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणुकीनुसार केली जाते. या यात्रेमध्ये काही विशेष धार्मिक विधी असतात, जसे की अहेराम नावाचा खास पोशाख परिधान करणे, काबा शरीफची सात वेळा प्रदक्षिणा घालणे (तवाफ), नमाज अदा करणे, 'लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक' असे म्हणून प्रार्थना करणे, सफा आणि मरवा या टेकड्यांदरम्यान सात वेळा धावणे आणि केस कापून घेणे. या सर्व विधींमुळे उमरा यात्रेला इस्लाममध्ये खूप महत्त्व आहे.
हमीद आत्तार आणि त्यांच्या पत्नी सायराबी आत्तार यांच्या सामाजिक कार्यामुळे आणि त्यांच्या चांगल्या लोकांमुळे ते उमराह यात्रेला जात आहेत असे समजताच, इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सर्व धर्मांचे लोक उपस्थित होते, ज्यामुळे त्यांचे सर्वधर्म समभावाचे कार्य दिसून येते.
यावेळी इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे प्रमुख प्राध्यापक कृष्णा ताटे, ॲड. गिरीश शहा, इंदापूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा मायाताई विंचू, अलका ताटे, महादेव चव्हाण सर, शिवाजी मखरे, अनिल पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दगडू सिद, शेटे सर, अविनाश कोथमिरे, शेखर पाटील, गफूर सय्यद, फकीर पठाण, परबत सर, गुंड गुरुजी, संतोष देवकर, संतोष जामदार, हाजी सलीम भाई बागवान, नासिर भाई, सचिन पलंगे, नानासाहेब देवकर, अशोक अनपट, सचिन चौगुले, अशोक पोळ, सिकंदर बागवान, चांद पठाण, अमोल खराडे, अजय बारसे, हाजी असलम भाई बागवान, अशोक ननवरे आणि इतर अनेक नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
