इंदापूर: नवरात्रोत्सवाच्या उत्सवी वातावरणात, रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल आणि मैत्रिण ग्रुप, इंदापूर यांनी आयोजित केलेला ग्रॅड दांडिया महोत्सव २०२५' हा कार्यक्रम वाघ पॅलेस, इंदापूर येथे जल्लोषात पार पडला. यावेळी महिलांच्या अलोट गर्दीने वाघ पॅलेस खचाखच भरले. रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा आणि दांडियाच्या झंकारात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला! कार्यक्रमाच्या रंगात भर पडली ती मुंबईहून आलेल्या प्रसिद्ध “बधाई इव्हेंट्स” ऑर्केस्ट्राने. त्यांच्या थरारक सादरीकरणाने उपस्थितांना नृत्याच्या अविस्मरणीय लयीत झुलवले. रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.ज्ञानदेव डोंबळे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. केवळ दांडियाच नव्हे, तर नुकत्याच झालेल्या “मोदक स्पर्धा” आणि “गौरी सजावट स्पर्धा” मधील विजेत्यांना याच व्यासपीठावर सन्मानाने बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच दोन्ही स्पर्धांमधील जवळपास 100 पेक्षा अधिक महिलांचा सन्मान करण्यात आला. स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या महोत्सवात स्पर्धात्मकतेची किनार होती.आकर्षक पुरस्कारांनी विजेत्यांना गौरविण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष रो.प्रदीप गारटकर, भावी प्रांतपाल रो.नितीन ढमाले, माजी प्रांतपाल रो.पंकज शहा, रोटरी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रो.वसंतराव मालुंजकर, रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलचे संस्थापक अध्यक्ष रो. ज्ञानदेव डोंबाळे, मैत्रिण ग्रुपच्या अध्यक्षा रो.अनुराधा गारटकर,अॅड.प्रतिमा भरणे, रोटरी खजिनदार रो.सुधीर शेंडे, सचिव रो.अप्पासाहेब बंडगर व इतर मान्यवर उपस्थित होते. रीलस्टार किरण पुणेकर, नमिता पाटील, अर्चना जावळेकर, अस्मिता, प्राची सावंत यांच्या नृत्यांनी कार्यक्रमास आणखी रंगत आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय तुळजा भवानी दुध संकलन केंद्र चे चेयरमन श्री.महादेव सातपुते, जय इंस्टीट्युट ऑफ नर्सिंग च्या संचालिका लता नायकुडे, सौ.शोभा किसन एकाढ, सौ.त्रिशला पाटील,सौ.योगिता कचरे, सौ.छाया तरंगे,सौ.स्नेहा टेळे, सौ.रोहिणी बंडगर, रो.मंदाकिनी डोंबाळे, रो.सोनाली कदम, रो.रत्नमाला इजगुडे, रो.अमृता शिंदे, रो.हेमलता मालुंजकर, रो.जयवंत नायकुडे, रो.आझादमामा पटेल , रो.प्रशांत शिताफ, रो.प्रताप कदम, रो.किरण सातपुते, रो.महादेव काळे, रो.मोरेश्वर कोकरे, रो.चंद्रकांत तरंगे, रो.सुनील टेळे, रो.अमर बंडगर, रो.अजिनाथ मारकड, रो.जितेंद्र जैस्वाल, रो.राजाराम सागर, रो.संजय राउत, रो.विष्णू पवार, रो.काकासो चव्हाण, रो.मोहन भोसले, रो.प्रदीप अग्रवाल, रो.सुनंदा वाघमारे, रो.तानाजी दडस, रो.दीपक सातव, रो.दत्तात्रय हेगडे, रो.औदुंबर तांबिले यांनी परिश्रम घेतले.
“हा सोहळा म्हणजे केवळ दांडियाचा महोत्सव नाही, तर इंदापूरच्या महिला शक्तीचा आणि त्यांच्या उत्साहाचा जयघोष आहे! वाघ पॅलेसमध्ये झालेली महिलांची ही गर्दी आम्हाला प्रचंड प्रेरणा देऊन गेली. मिळालेली ऊर्जा आम्ही पुढच्या समाजोपयोगी उपक्रमांसाठी वापरणार आहोत. विवध स्पर्धांमधील महिलांचा उत्साह पाहून आम्ही भविष्यातही असेच व्यासपीठ उपलब्ध करून देऊ “ असे रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल चे अध्यक्ष रो.ज्ञानदेव डोंबाळेसनी सांगितले.


.jpeg)