इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभाग, अर्थशास्त्र विभाग व उद्योजकता विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता विकास कार्यक्रम ७ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होणार आहे.संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक काळंगे,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग,प्रा.प्रशांत शिंदे, प्रा. ऱाजेंद्र्कुमार डांगे,प्रा.योगेश खरात ,प्रा सोनाली चव्हाण ,प्रा सुजाता निंबाळकर ,प्रा अभिजीत शिंगाडे इ मान्यवर उपस्थित होते.
उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत वाणिज्य विभाग व अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी यांनी दिवाळीसाठी आवश्यक असणारे उटणे,शिकेकाई,विविध सुगंधी द्रव्ये,अत्तर, पणती बनवणार तयार केल्या आहेत.या साहित्यांची "विश्वानंद" व "रावी" या दोन नावांनी विक्री केली जाणार आहे. संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता गुण विकसित होणार आहे. तसेच विविध कौशल्य ही विद्यार्थ्यांमध्ये यातून विकसित होतील. हा या उपक्रम आयोजन पाठीमागचा उद्देश असल्याचे सांगितले. यामध्ये नागरमोथा, कचोरा, गव्हला कचोरा , बावची, आवळा, चंदन पावडर शिकेकाई, रिठा,जास्वंद या आयुर्वेदिक सामग्रीच्या साह्याने उठणे व शिकेकाई तयार करणे तसेच मातीच्या पणती स्वच्छ करून रंगविणे, विविध रंग, मोती, लेस, स्टोन व डिझाईन वापरून सजावट करणे, कमी खर्चात सुंदर आणि विक्रीयोग्य उत्पादने कशी तयार करायची याचे मार्गदर्शन देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी वाणिज्य विभाग, अर्थशास्त्र विभाग व उद्योजकता विकास कार्यक्रम समितीमधील प्रा.योगेश खरात, प्रा.अभिजीत शिंगाडे, प्रा.सोनाली चव्हाण, प्रा.नितीन रुपनवर, प्रा. सुजाता निंबाळकर, प्रा.ज्ञानेश गवळी, डॉ अमित शेटे, प्रा. धुळदेव वाघमोडे या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू विद्यार्थ्यांमार्फत महाविद्यालय व परिसरातील गावात विक्री करण्यात येणार आहे.
