वार मंगळवार दिनांक १४/ १०/ २०२५ रोजी सकाळी ११.00 वाजता कालठण नंबर २ केंद्रातील जि प प्राथमीक शाळा नरूटवाडी या शाळेमध्ये शंकरराव जावडेकर ट्रस्टच्या वतीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमास कालठण नं २ या केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री. शेलार साहेब, या शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय ठोंबरे, सौ ठोंबरे तसेच ट्रस्टचे मार्गदर्शक मा . प्राचार्य अरविंद गारटकर सर, प्रा. कृष्णा ताटे सर, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार, लेखक महादेव चव्हाण सर, भारत बोराटे सर, हनुमंतराव गोफणे, मोहिते सर, शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमुख नरुटे साहेब, आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. पुस्तक वाटपानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय ठोंबरे सरांनी केले. अशा १५ शाळांना ३५० पुस्तकांचे वाटप केले.
इंदापूरचे समाज सुधारक शिक्षण पितामह शंकरराव जावडेकर पुस्तक वितरण पद्माकर जावडेकर (बेंगलोर) यांच्या सौजन्याने करण्यात आले ,त्याबरोबर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. जि प प्राथमीक शाळा कालठण नं. २ कवयत्री श्रीमती प्रतिभाताई गारटकर यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना फळांचे वाटपही करण्यात आले. पुस्तके इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांना सहजपणे वाचता येतील अशीच स्वरूपाची आहे. सहज विद्यार्थ्यांना वाचता येईल त्यामध्ये चित्रकृती युक्त अशी काही पुस्तके आहेत. संतांची ओळख संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ,संतश्रेष्ठ तुकाराम महाराज ,गोष्टींची, थोर नेते,छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, आदर्श माता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, समाज सुधारक अशा विविध पुस्तकांचे वाटप करण्यात आले. जि .प .प्राथमीक शाळा पाडुळे वस्ती शिक्षक अशोक माळी, श्रीमती सोनिया चौरे, जि प प्राथमीक शाळा शिरसोडी शिक्षक संतोष मोहिते, संजय राऊत, विनोद नरूटे जि प प्राथमीक शाळा माळवाडी नंबर एक शिक्षिका श्रीमती छाया चेंडके , जयश्री धाईजे ,या सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते. शाळांमध्ये आपण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करतो विद्यार्थ्यांकडून या पुस्तकांचे वाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

