पुणे जिल्ह्यातील कलाशिक्षक बांधवांचे प्रश्न नेहमीच शासन दरबारीं, मांडणाऱ्या पुणे जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या वतीने, शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना मुबंई येथे निवेदन देण्यात आले.निवेदनात कलाध्यापक संघ पुणे यांनी येणाऱ्या पवित्र पोर्टल फेज -3 या संगणक प्रणाली द्वारे होणाऱ्या शिक्षक भरती मध्ये कला शिक्षक पदाचा समावेश करून, कायम स्वरूपी कला शिक्षक भरती ही, शाळा तिथे शिक्षक या तत्वावर करावी तसेच, नवीन शैक्षणिक धोरणानुसार ( NEP ) कला विषयाला खूप महत्व दिले गेले आहे.त्या अनुषंगानेही नवीन संच मान्यतेच्या निकषामध्ये, विशेष शिक्षक पद कला शिक्षक यासाठीची विध्यार्थी संख्येची अट ही शिथिल करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी शिक्षण मंत्री यांनी यावर्षीच्या येणाऱ्या पवित्र पोर्टल फेज -3 शिक्षक भरती मध्ये पवित्र पोर्टल द्वारेच कला शिक्षक यांची भरती केली जाईल असे आश्वासन यावेळी उपस्थित सर्व कलाध्यापक यांना दिले.
नुकत्याच झालेल्या पवित्र पोर्टल 2024 ,फेज -2 मध्ये ही ,कला शिक्षक भरतीची पदे ही सदर पवित्र पोर्टल मध्ये दिलेली नव्हती. त्यामुळे गतवर्षीच्या येणाऱ्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 - फेज -3 मध्ये यावर्षी तरी, कला शिक्षक पदे ही पोर्टल मार्फत व कायम स्वरूपी भरावीत असे आवाहन पुणे जिल्हा संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष महेश मोरे यांनी केले आहे.यावेळी पुणे जिल्हा कलाध्यापक संघाच्या अध्यक्षा अश्विनीताई कदम,संघाचे विभागीय उपाध्यक्ष महेश मोरे,कोषाध्यक्षा निताली हरगुडे,सचिव सुनील बोरले, सहसचिव बापूराव कदम,सदस्य मनोज शिंदे,रणजित खुडे,प्रमोद धापटे, शिवराज पांचाळ,दीपाली फुंदे,शेखर कलशेट्टी,जयदीप नागवडे,राज्यातील कला शिक्षक उपस्थित होते..
