इंदापूर, दिपक जगताप
इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राधिका संदेश शहा ( वय ५५ ) यांचे दिनांक १२ जानेवारी रोजी रात्री ११.४८ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, सासू, पती, दोन मुली व एक मुलगा, दीर, जाऊबाई, दोन पुतणे, एक पुतणी असा परिवार आहे. त्यांनी मरणोत्तर नेत्र, ह्दय, किडनी, लिव्हर दान करून सहा जणांना जीवदान दिले. त्यामुळे त्या आपल्यामध्ये नसल्यातरी अवयवदान रूपाने त्या जिवंत आहेत. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत दिनांक १३ जानेवारी रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप गारटकर, उपाध्यक्ष मुकुंद शहा, माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा, नगराध्यक्ष भरत शहा यांच्या सह त्यांनी सर्व जिव्हाळ्याच्या शक्ती एकत्र करून इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी, गोखळी, विठ्ठलवाडी ही तीन गावे टँकर मुक्त करण्यासाठी इंदापूर रोटरी क्लब ला सकाळ तनिष्का म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने तसेच कार्यकारी संचालक विष्णुकुमार माने यांच्या सहकार्या मुळे त्यांनी जपानी केंगन अल्कलाइन आयोनाइजड वॉटर ही शास्त्रोक्त जलचिकित्सा पद्धत सर्वत्र पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, दैनिक सकाळ चे सेवानिवृत्त इंदापूर तालुका प्रतिनिधी, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शरद शहा यांच्या त्या पत्नी होत्या. सकाळ मधुरांगण, तनिष्का व्यासपीठ माध्यमातून त्यांनी केंद्र संचालिका म्हणून विविध उपक्रम राबवून महिला सक्षमीकरण करण्यासाठी योगदान दिले. केंद्र सरकारच्या शेतकरी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत त्यांनी सहाशे शेतकऱ्यांना गट शेतीचे प्रशिक्षण देण्यासाठी इंदापूर तालुक्यात तीन गावी केंद्र संचालिका म्हणून काम पाहिले. इंदापूर येथे येणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांना त्यांनी मोफत आरोग्य शिबिरा व्दारे एक महिन्याची मोफत होमिओपॅथिक औषधे देऊन तेहतीस वर्ष वारकरी सेवा केली. त्यांनी दहा वेळा जोडीने रक्तदान करून रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असा संदेश दिला. बाराशे मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबीनची चाचणी करून त्यांना आरोग्य मार्गदर्शन केले. त्यांनी आतापर्यंत आरोग्य धनसंपदा या विषयावर शेकडो व्याख्याने दिली. कोरोना महामारीत ज्या रुग्णांना हॉस्पीटल मध्ये बेड मिळाले नाही, अश्या २२० रुग्णांना त्यांच्या घरी जाऊन औषधे देऊन त्यांनी बरे केले होते. इंदापूर येथील श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर उभारणी मध्ये त्यांनी खारीचा वाटा उचलला. होमिओपॅथीच्या प्रचारासाठी त्यांनी मोफत १०० हून जास्त शिबिरे घेतली. त्यांनी डॉ. संदेश शहा यांच्या सोबत इंदापूर येथे पंधरा हून जास्त चर्चासत्र घेऊन होमिओपॅथीचा प्रचार केला. इंदापूर तालुक्यात नेहरू युवा केंद्राच्या गणेशवाडी येथील तूर खरेदी केंद्र, पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण, युवापिढी साठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदी विविध उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी योगदान दिले. इंदापूर शहराच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, युवक युवती सक्षमीकरण, शेती, आरोग्य आदी क्षेत्रात डॉ. शहा यांनी लक्षवेधी योगदान दिल्याने त्यांच्या अकाली मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने, नगराध्यक्ष भरत शहा, नगरसेवक सागर अरगडे आदींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दैनिक पुढारीचे पुणे आवृत्तीचे संपादक सुहास जगताप, दैनिक सकाळ चे सेवानिवृत्त पुणे आवृत्ती संपादक रमेश डोईफोडे सर, मकरंद पावनगडकर, सौ. वैशाली भरत शहा, सौ. सायली संजय शहा, प्रा. तुषार रंजनकर, प्रा. संजय चाकणे, श्री. माळवदकर सर, उद्योजक दिलीप चौधरी, इंदापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मोरे, इंदापूर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष आझाद पटेल, एलआयसीचे उच्च अधिकारी प्रतीक शिंदे, सद्गुरू असोसिएटचे विश्वस्त संदीप पांढरे, जनार्दन क्षीरसागर, सूर्यकांत कडू, अशोक गायकवाड, अमोल चिवरे, सुरेखा यादव, अंकुश सूर्यवंशी, अभिमन्यू भोंग, किसनराव भांगे, रावसाहेब गलांडे, राजेंद्र हुपरीकर, खंडेराव सोनवले, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष, हाजी एम. डी. शेख, परिषद संचलित पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा निरीक्षक शौकतभाई तांबोळी, जिल्हा संघटक कैलास पवार, तालुकाध्यक्ष संतोष आटोळे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष निळकंठ मोहिते, सुधाकर बोराटे, मनोहर चांदणे, प्रशांत चवरे सुहास जकाते, राजेंद्र राहिगुडे, सुभाष पानसरे आदींनी डॉ. संदेश शहा यांचे सांत्वन केले.
राधाई
कहा गई मासूम सी भोली भाली सुरत राधाई
सेह ना सकेंगे हम उनके बिना गहरी *जुदाई*
कैसे हो गई न जाने कोई आपकी *बिदाई*
वा रे वा खुदा अब जान चुके हम तेरी *खुदाई*
आखिर तक रहोगे इस प्यारीसी दुनियाके *कणकणमे*
आपको भूलना मुश्किल है याद है हमारे *मन मन में*
क्या से क्या हो गया मालूम भी नही कुछ *क्षणमे*
खुश रहो और आजाद रहो तुम्हारे अगले नये
*जनम मे*
यही तो है अखिर दुनियादारी की पुरानी रीवाज *रीत*
छोड जाते है ऐसे ही सभी अपने वालो से लगाकर *प्रीत*
हार गये है खाली हात अब तो हो गई आपकी *जीत*
गायेंगे हम तुम्हारी ही याद मे रो रो के दर्द भरे *गीत*
*शब्दांकन*
पुष्पराज जमदाडे
प्रकाश बलदोटा
इंदापूर
