इंदापूर – शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर व विश्वस्त श्री.अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान समारंभ अल्फा बाईट कॉम्प्यूटर्स येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री.सचिन खुडे उपस्थित होते.
या समारंभात श्री.ना.रा.हायस्कूल मधील तृप्ती कोल्हे, गायत्री नरुटे, भाग्यश्री व्यवहारे,श्रावणी दुधनकर, ईश्वरी चेंडगे, राधिका विद्यालयातील ईश्वरी गलांडे, असद शेख, आयेशा शेख, रोहन नरुटे, श्रुष्टी व्यवहारे, मालोजीराजे विद्यालयातील गणेश राऊत, प्रिया कांबळे,चैत्राली वाघमोडे,समृद्धी मारकड,समृद्धी वाघमोडे या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विविध शाळांमधील या गुणवंत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करणे व त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा होता.
प्रमुख पाहुणे श्री. सचिन खुडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच सामाजिक जाणिवा ठेवण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले, “यश हे केवळ गुणांमध्ये नसते, तर आपण पाहिलेले स्वप्न साध्य करण्यासाठी केलेली धडपड व प्रयत्न यातून जे साध्य करतो त्याला यश म्हणतात.अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावतो.”
कार्यक्रमात संस्थेचे खजिनदार श्री.तुषार रंजनकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत सांगितले, “गावाकडील विद्यार्थ्यांमध्ये खूप क्षमता आहे. त्यांना योग्य वेळेस प्रोत्साहन मिळाले तर ते निश्चितपणे यशाच्या शिखरावर पोहोचू शकतात.”
या कार्यक्रमासाठी १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे प्रकल्प अधिकारी श्री.सागर कांबळे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे इन्चार्ज श्री. दिपक जगताप, केदार गोसावी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती चारुशीला शिंदे, अभिजित तळेकर यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व प्रेरणा स्पष्टपणे दिसत होती. ट्रस्टच्यावतीने अशा उपक्रमांचे सातत्य राखले जाईल, असेही यावेळी जाहीर करण्यात आले.
