इंदापूर, २६ जून २०२५: आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या श्री सद्गुरू चौरंगीनाथ महाराज पालखीचे आज सायंकाळी ७ वाजता इंदापूर शहरात उत्साहात आगमन झाले. केडगाव, ता. दौंड येथून निघालेल्या या पायी दिंडीचे हे ८० वे वर्ष आहे.
पालखीचे आगमन होताच इंदापूरकरांनी पारंपरिक उत्साहात त्यांचे स्वागत केले. पालखीचे प्रमुख महंत योगी संगम नाथजी महाराज, मठाधिपती महंत योगी लक्ष्मण नाथजी महाराज, चोपदार पांडुरंग चौधरी, पुजारी ज्वाला नाथजी चंद्रनाथजी योगी, आदित्यनाथजी योगी, सुर्यनाथ आणि इतर सर्व साधूंचा सत्कार कुमारशेठ ढोले यांनी केला. तसेच, सिद्धेश्वर मंडळ व ट्रस्टतर्फे दिंडी प्रमुखांचाही सत्कार करण्यात आला.
परंपरेनुसार, सद्गुरू चौरंगीनाथ महाराज पालखीचा मुक्काम इंदापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर येथे असतो. सायंकाळी वारकऱ्यांसाठी सिद्धेश्वर मंदिराचे मंडळ आणि इंदापूर शहरातील नागरिकांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. यानंतर, सायंकाळी ह.भ.प. ओंकार महाराज जौंजाळ यांचे कीर्तन संपन्न झाले, ज्याचा लाभ अनेक भाविकांनी घेतला.
यावेळी सिद्धेश्वर गणेशोत्सव मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि ट्रस्टचे अध्यक्ष कुमार ढोले, उपाध्यक्ष प्रसन्न दुनाखे, खजिनदार गजानन निलाखे सर, महेश भिंगे, श्रीनिवास बानकर, ॲड. रुद्राक्ष मेणसे, महेंद्र बानकर, सफल घासकाटू, धिरज शहा, मंडळाचे अध्यक्ष गणेश भंडारी, सुनिल भंडारी, अरुण भंडारी, श्रीकांत गुरव, गिरीश गुरव, आरती मंडळाचे प्रमुख महादेव चव्हाण सर, आणि हमीदभाई आत्तार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सद्गुरू चौरंगीनाथ महाराजांच्या पालखीच्या आगमनाने इंदापूर शहरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
