इंदापूर शहरात २९ जून २०२५ रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी भजन-कीर्तनाच्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात दाखल झाली. या पवित्र आणि भक्तिमय वातावरणात, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टने वारकऱ्यांसाठी विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन केले. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर आणि विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम ट्रस्टच्या प्रांगणात पार पडले. यामध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार, मोफत अल्पोपहार व चहा, चरणसेवा आणि मोफत रेनकोट वाटप या सेवांचा समावेश होता. या उपक्रमांचा शेकडो वारकऱ्यानी लाभ घेतला.
संस्थेने आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी व औषधोपचार मध्ये वारकऱ्यांना आपल्या आरोग्याची सद्यस्थिती समजण्यास मदत झाली आणि आवश्यकतेनुसार त्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले तसेच आवश्यकतेनुसार औषधे देण्यात आली. वारकऱ्यांसाठी मोफत अल्पोपहार व चहाचे वितरण केले. त्याचप्रमाणे, पावसाळ्यात वारीला निघालेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ट्रस्टने मोफत रेनकोट वाटपाची योजना राबवली. यामुळे वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण मिळाले आणि त्यांचा प्रवास अधिक सुखकर झाला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे खजिनदार श्री.तुषार रंजनकर, विश्वस्त श्री.अरविंद गारटकर, शुभांगी रामटेके, श्री.किशोर मालोकार, श्री.भारत बोराटे, श्री.हमीदभाई अत्तार, डॉ. सारंगी कुंभार, श्री.दिपक जगताप, श्री.सागर कांबळे, श्री.अमोल राउत, भारत माने हे उपस्थित होते. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामुळे एकात्मतेचे आणि भक्तिरसाचे महत्त्व अधोरेखित होते. हे महत्त्व ओळखून शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट वारकऱ्यांसाठी दरवर्षी वारकऱ्यासाठी असे उपक्रम राबवत असते.


