ज्येष्ठा गौरी पूजनाच्या शुभ पर्वावर, रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलने गौरी सजावट स्पर्धेचे भव्य आयोजन केले. या उपक्रमाला शहरातील अनेक कुटुंबांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक घरात जाऊन परीक्षकांनी गौरींच्या आकर्षक सजावटींचे निरीक्षण केले आणि स्पर्धकांचे कौतुक केले.
रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलचे अध्यक्ष श्री.ज्ञानदेव डोंबाळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला मूर्त स्वरूप मिळाले.. अध्यक्षांनी सांगितले की, “गौरी पूजन हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. अशा स्पर्धांमुळे पारंपरिक सणांना आधुनिकतेची जोड मिळते आणि समाजात उत्सव साजरा करण्याची प्रेरणा वाढते.”या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी क्लब ट्रेनर रो.मंदाकिनी डोंबळे, रो.सोनाली कदम, रो.रत्नमाला इजगुडे,रो.लता नायकुडे, तसेच रोटरी अॅन सौ.रोहिणी बंडगर,सौ.छाया तरंगे तसेच समाजसेविका सौ.योगिता कचरे यांनी केली.
स्पर्धकांनी आपली कलात्मकता आणि सर्जनशीलता आकर्षक, पर्यावरणपूरक सजावटींमधून व्यक्त केली. परीक्षकांनी प्रत्येक सजावटीतील वेगळेपण आणि सौंदर्य जाणून घेतले. स्पर्धेतील विजेत्यांची नावे लवकरच घोषित केली जातील, असे आयोजकांनी सांगितले. रोटरी क्लबच्या या उपक्रमामुळे नागरिकांना एकत्र येण्याची संधी मिळाली आणि सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक झाली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी डीस्ट्रीक्ट ३१३१ चे लिटरसी डायरेक्टर रो.वसंतराव मालुंजकर,रो.जयवंत नायकुडे व रो.प्रशांत शिताफ यांचे विशेष सहाय्य लाभले.
