इंदापूर तालुक्यातील ७०५ हून अधिक विद्यार्थ्यांना स्लीपिंग व शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमाच्या आयोजनात रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल ने मुख्य भूमिका बजावली आहे. रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोनमेंट आणि SCAW–कॅनडा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि.२७ नोव्हेंबर २०२५ रोजी 'चिल्ड्रेन्स ब्लिस प्रोजेक्ट' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ७०५ हून अधिक ग्रामीण आणि गरजू विद्यार्थ्यांना स्लीपिंग किट्स आणि शालेय साहित्य किट्सचे वाटप केले जाणार आहे. हा कार्यक्रम राजीवप्रताप आरोग्य धाम, गलांडवाडी नं. १, पुणे–सोलापूर महामार्ग येथे आयोजित करण्यात आला असून, रोटरीच्या 'सेवा परमोधर्मः' या मूल्यांची खरी अनुभूती देणारा हा प्रकल्प रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल च्या अथक प्रयत्नांचे प्रतीक आहे.
रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल च्या पुढाकारामुळेच हा प्रकल्प साकारला असून, त्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ मुलांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करणे हे उद्दिष्ट ठेवले आहे. क्लबच्या अध्यक्ष रो.ज्ञानदेव डोंबाळे यांनी स्पष्ट केले की, या उपक्रमामुळे अनेक मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा आहे. रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल च्या सदस्यांचा आणि स्वयंसेवकांचा मोठ्या संख्येने असलेला सहभाग या प्रकल्पाला अधिक प्रभावी बनवत आहे, ज्यामुळे हा सामाजिक उपक्रम इंदापूर परिसरातील गरजू मुलांसाठी एक वरदान ठरत आहे.

