इंदापूर, डॉ. संदेश शहा
युवापिढी खूप शिकली आहे, मात्र त्यांना नोकरी नाही. त्यामुळे युवापिढीस आत्मनिर्भर करण्यासाठी इंदापूर येथील मूकबधिर विद्यालय प्रांगणात रविवार दिनांक १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या महोत्सवाचे मुख्य संयोजक प्रदीप गारटकर यांनी दिली. आमचे नेते प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे नियोजनबध्द आयोजन प्रदीपदादा मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, माजी उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस, वसंतराव माळुंजकर, मिलिंद दोशी, श्रीधर बाब्रस, अनिल राऊत, राजेश शिंदे यांनी दिली. युवापिढीस बारामती तसेच इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहती मध्ये नोकऱ्यांची संधी असून नोकरी महोत्सवाअंतर्गत नामांकित कंपनीचे अधिकारी युवक युवतींच्या मुलाखती घेणार आहेत.
त्यामुळे आय टी आय, डिप्लोमा, बी ई मेकॅनिकल इंजिनिअर, सर्व शाखेचे पदवीधारक यांनी आपल्या शैक्षणिक अर्हतेसह सर्व कागदपत्रे घेऊन वेळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. या महोत्सवात १८ ते ३० वर्षाच्या युवक युवतींना नोकरीची संधी मिळणार असून त्यांची निवड झाल्यानंतर त्यांना १८ ते ३५ हजार रुपये पगार मिळणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी संजय शिंदे ( 9309105326 ), अक्षय गानबोटे ( 9561948077 ), वसीम शेख ( 7057407111 ), अनिलअण्णा पवार ( 9890999896 ), अक्षय शिंदे ( 9637418001) व रुपेश सोनी ( 9890585757 ) यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सुभाष मोरे यांनी केले आहे.
