पुणे, १७ जुलै, २०२५: पुणे जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या (PMFBY) अंमलबजावणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत खरीप हंगाम २०२५ साठी भारतीय कृषी विमा कंपनीच्या (AIC) भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डूडी यांच्यासोबतच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. काचोळे आणि भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी श्री. विकास राखुंडे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी कृषी विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

