इंदापूर प्रतिनिधी : श्री. महादेव चव्हाण सर
इंदापूर शहराचे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने शनिवार, दिनांक १६ मे २०२६ रोजी सायंकाळी ठीक ७:०० वाजता शनी जयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मंदिरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी विहित वेळेत श्री शनी देवांची महाआरती संपन्न झाली. या आरती सोहळ्याला इंदापूर शहरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
या धार्मिक कार्यक्रमाला इंदापूर शहरातील स्वामी समर्थ मंडळाच्या महिलावर्ग, तसेच शहरातील इतर महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय आणि प्रार्थनीय ठरली. शनी देवांची सामूहिक आरती झाल्यानंतर लगेचच महाप्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले. या महाप्रसादाचा लाभ शहरातील असंख्य महिला, पुरुष आणि बाल गोपाल यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजकुमार ढोले, खजिनदार निलाखे, तसेच ट्रस्टचे पदाधिकारी संतोष घासकाटू, सफल घासकाटू आणि महेश भिंगे यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्व पदाधिकाऱ्यांनी इंदापूर शहरातील ग्रामस्थांना सोबत घेऊन महाप्रसादाचे चोख आणि भव्य आयोजन केले होते. त्यांच्या या नियोजनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या मंगलमयी प्रसंगी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार, भारत बोराटे सर, महादेव चव्हाण सर या मान्यवरांचा समावेश होता. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
मान्यवरांसोबतच इंदापूर शहरातील असंख्य तरुण कार्यकर्ते आणि ग्रामस्थ या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांच्या सामुदायिक सहभागातून आणि शिस्तीतून हा शनी जयंती उत्सव अत्यंत पारंपरिक आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.

