इंदापूर, डॉ. संदेश शहा
आजच्या काळात महिलांनी आर्थिक स्वावलंबन करून वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे महिला सक्षमीकरण करण्यासाठी या गावात महिला अस्मिता भवन बांधले जाईल. जीवन जगताना आनंदी जीवनाचा मुलमंत्र जोपासणे गरजेचे आहे. गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांनी एकोप्याने राहावे असा मौलिक संदेश मंत्री भरणे यांनी दिला. स्थानिक प्रश्नाचे दिलेल्या निवेदनावर सर्व प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविले जातील अशी ग्वाही मंत्री श्री. भरणे यांनी दिली. कालठण पुनर्वसन उभारणीत कै. दतात्रय जाधव, भिमराव पाडुळे, गुलाबराव पाटील, तुकाराम शिंदे यांनी महत्त्वाचे योगदान दिले असल्याचे मंत्री भरणे यांनी आवर्जून सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य यशराज जगदाळे, दिलीप भिसे, हर्षदा जाधव, अमोल भिसे, संदेश देवकर, निलेश देवकर, अशोक शिंदे, तानाजी नरूटे, अंकुश पाडुळे, आपा माने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन १९५७ साली कबड्डी संघाचे क्रीडापटू दत्तात्रय जाधव, वामन जाधव, वडजीनाथ माने, गौतम गटकुळ, अर्जुन गटकुळ, हरीदास चिंचकर, विठ्ठल सपकळ, साहेबराव शिंदे, साहेबराव जगताप या कबड्डी संघाचे नेतृत्व केलेल्या क्रीडापट्टूंचा तसेच दिवंगत क्रीडापट्टू यांच्या कुटुंब सदस्यांचा सत्कार मंत्री दत्तात्रय भरणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सुवर्णमहोत्सवी वर्ष यशोगाथा आठवणी भगवान कोळेकर, सचीन जाधव, अण्णासाहेब धोत्रे, महेश जाधव आदींनी सांगितल्या. कार्यक्रम समन्वयक म्हणून सतीश शिंदे व सचीन जाधव यांनी काम पाहिले.
कार्यक्रम यशस्वीते साठी लालासाहेब जगताप, किसनराव जावळे, भास्कर पाडुळे संजय माने, बाळासाहेब मदने, नितीन जावळे, अण्णासाहेब कोळेकर, विजय जेडगे, गणेश गाटशिळे, श्रीकांत पवार, हनुमंत पांडुळे, नितीन दीक्षित व ग्रामस्थानी प्रयत्न केले. प्रस्तावना प्रा. सतीश शिंदे यांनी तर सुत्रसंचलन भास्कर जगताप व अविनाश शिंदे यांनी केले. आभार समीर पाडुळे यांनी मानले.

