शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा मा. पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर व विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शंकरराव पाटील कोपीवरची शाळा अभ्यासवर्ग या उपक्रमांचे उद्घाटन सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना बिजवडी , सहयोगी ओंकार शुगर अँड डीस्ट. प्रा.लि. युनिट नंबर 11 येथील उसतोड मजुरांच्या वसाहतीमध्ये संपन्न झाले. हा कार्यक्रम कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री. रणजीत तावरे साहेब यांच्या विशेष सहकार्याने पार पडला. यावेळी केन मॅनेजर श्री. बबन हुलगे, मुख्य शेतकी अधिकारी श्री. किशोर हिंगमिरे व ट्रस्टचे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गेली पाच वर्ष झाली ऊसतोड मजुरांची शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर जाऊन मोफत आरोग्य तपासणी व आवश्यक औषधोपचार केले जातात. आत्तापर्यंत पस्तीस हजार पेक्षा जास्त lऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले आहेत. तसेच शंकरराव पाटील चॅरिटेबल कोपीवरची शाळा अभ्यासवर्ग हा उपक्रम मागील चार वर्षे सुरु आहे. कारखान्याच्या परिसरातील मजूर वसाहतीमध्ये हा अभ्यासवर्ग भरवला जातो. उपक्रमांतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण दिले जाते आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व उपक्रमात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. उद्घाटनप्रसंगी कोपीवरच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप आणि खाऊ वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी १०१ ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधे देण्यात आली.
या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख श्री. महादेव चव्हाण, कोपीवरची शाळा अभ्यासवर्ग चे प्रमुख श्री. भारत बोराटे, सामाजिक कार्यकर्ते श्री. हमीद भाई आतार, ट्रस्टचे प्रकल्प अधिकारी श्री. सागर कांबळे, कारखान्याचे ऊस पुरवठा अधिकारी श्री. गणेश पोळ, आरोग्य केंद्राच्या डॉ. सारंगी कुंभार यांच्यासह श्री. नवनाथ व्यवहारे, श्री. अनिल व्यवहारे, संदीप बोराटे, श्री. विठ्ठल गुणवरे, बिजवडी ग्रामपंचायतीचे सदस्य देविदास यादव, सामाजिक कार्यकर्ते बापूराव चव्हाण, श्री. बांदल, श्री. गंडाळ व श्री. साळुंखे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केदार गोसावी, शिवाजीराव गोफणे, भक्ती चव्हाण व श्रुती सापळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
