इंदापूर, डॉ. संदेश शहा
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात नीरा भीमा नद्यांच्या संगमावर वसलेल्या तसेच तालुक्यातील एकमेव पर्यटन तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र नरसिंहपूर हे कुलदैवत आहे. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इंदापूर तालुक्याचे आमदार तथा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या प्रयत्नातून निरा भीमा नद्यांच्या संगमावर असलेल्या इंदापूर तालुक्यातील एकमेव पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र नरसिंहपुर येथे पोलीस स्टेशन चालू झाल्याने नागरिकांनी तसेच भाविकांनी समाधान व्यक्त केले. डीवायएसपी श्री राठोड तसेच नीरा नरसिंहपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन चेके यांच्यावरती प्रभारी अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी सहाय्यक फौजदार प्रकाश माने, सहाय्यक फौजदार भरत जाधव, पोलिस हवालदार जगन्नाथ कळसाईत, पोलिस हवालदार किरण चंदनशिवे, पोलिस हवालदार महेश गोसावी, महिला पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा जगताप, पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत सलगर, पोलिस कॉन्स्टेबल अरीब सय्यद, पोलिस कॉन्स्टेबल शनिदेव कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल समाधान अहिवळे, हे सर्व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट तर्फे सर्व अधिकारी यांना देवस्थानचा प्रसाद देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गावातील पोलीस पाटील अभयकुमार वांकर, देवस्थानचे व्यवस्थापक गौरव देशपांडे, गोशाळेचे अध्यक्ष गणेश सरवदे व अशोक सरवदे हे उपस्थित होते. नीरा नरसिंहपुर गावाचे सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे, माजी सरपंच अण्णासाहेब काळे, तंटामुक्त अध्यक्ष दशरथ दादा राऊत, माजी सरपंच विलास ताटे, कोळी महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय कोळी, सरपंच सचिन कदम, माजी सरपंच संतोष मोरे, प्रसिद्ध उद्योजक विजय सरवदे, प्रसिद्ध उद्योजक सागर इंगळे, हभप प्रभाकर जगताप महाराज, माजी सरपंच जगदीश सुतार, सामाजिक कार्यकर्ते समाधान सरवदे, माजी सरपंच चंद्रकांत सरवदे, धनंजय पवार, अतुल घोगरे, शंकर राऊत, सामाजिक कार्यकर्ते तानाजी जगदाळे, पैलवान गणेश भैय्या जगदाळे यांच्या हस्ते निरा नरसिंहपुर गावाच्या वतीने चेके साहेबांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे टनू सबस्टेशन चे वरिष्ठ यंत्रचालक महादेव वाघमोडे, सीनियर टेक्निशियन कर्तव्यदक्ष अधिकारी राम हरी रजपूत व त्यांचे सहाय्यक लखन चव्हाण यांच्या हस्ते देखील गजानन चेके साहेब यांचा सत्कार करण्यात आला. नीरा नरसिंहपुर भागातील पत्रकार, डॉक्टर सिद्धार्थ सरवदे, सतीश जगताप, धनंजय शेंडगे, राकेश कांबळे यांच्या हस्ते गजानन चेके साहेबांना शाल, श्रीफळ देत हार घालून तसेच पेढे भरवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
