इंदापूर : शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या 'ओजस बालसंस्कार वर्गाचा' विविध गुणदर्शन समारंभ दि.२१ फेब्रुवारी येथील अल्फा बाईटच्या हॉलमध्ये अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली.
या समारंभासाठी सुप्रसिद्ध योगप्रशिक्षक श्री.दत्तात्रय अनपट आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या उपप्रबंधक जान्हवी बरनावळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुंदर असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी उत्तम कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि मेडल देऊन विशेष गौरव करण्यात आला.
ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर आणि विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा 'ओजस बालसंस्कार वर्ग' दर शनिवारी यशस्वीपणे चालवला जातो.
या विशेष कार्यक्रमाला विश्वस्त श्री. अरविंद गारटकर, आरोग्य केंद्र प्रमुख श्री. महादेव चव्हाण, कोपीवरची शाळा प्रमुख श्री. भारत बोराटे, श्री. हमीद अत्तार, योगप्रशिक्षक श्री. दिलीप जाधव, सौ. अश्विनी गारटकर, श्री. दिपक जगताप, अमोल राऊत आणि केदार गोसावी आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ओजस वर्गाचे प्रशिक्षक तथा प्रकल्प अधिकारी सागर कांबळे यांनी केले.
