इंदापूर : शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर व विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'अल्फा बाईट कॉम्प्युटर्स' येथे इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. भरतशेठ शहा, गटनेते श्री. शकीलभाई सय्यद, नगरसेवक श्री. अक्षयदादा सूर्यवंशी आणि इंदापूरमधील प्रसिद्ध आर्किटेक्ट श्री. राकेश फडतरे उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवर व संस्थेचे खजिनदार श्री. तुषार रंजनकर व विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करून त्यांच्या पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष श्री. भरतशेठ शहा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि सांगितले की, दहावीचा टप्पा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा वळणबिंदू आहे. या टप्प्यावर मिळालेले यश हे विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाचे आणि पालकांच्या त्यागाचे फळ आहे, असे त्यांनी नमूद केले. खजिनदार श्री. तुषार रंजनकर यांनी, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट मागील दहा वर्षांपासून नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहून गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना मदत आणि प्रोत्साहन देण्याचे कार्य करत असल्याचे सांगितले.
या सोहळ्यात उत्कृष्ट गुण मिळवून यश संपादन करणाऱ्या प्रणाली रामदास गलांडे, श्रुती सुदर्शन पाटील, शिवानी ज्ञानेश्वर गिरी, श्रेया देविदास कोथमिरे, वैष्णवी वैभव शिंदे, दीक्षा दत्ता खांडेकर, प्रणेश पांडुरंग चोरमले, जिया जावीद काझी, श्रद्धा बाबासाहेब साळुंखे, शिवम प्रकाश साळुंखे, भावेश मारुती राऊत, तृप्ती सोमनाथ बोराटे, अर्जुन संदीप जाधव, या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
सर्व सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तके व शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. या कौतुक सोहळ्याला विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, ट्रस्टचे आरोग्य केंद्र प्रमुख श्री. महादेव चव्हाण, कोपीवरची शाळा प्रमुख श्री. भारत बोराटे, श्री. हमीदभाई अत्तार, इनचार्ज श्री. दीपक जगताप आणि त्रिशला पाटील उपस्थित होते. तसेच नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेदांत घोरपडे, अश्विनी पाटील, अभिजित तळेकर आणि आर्यमन गानबोटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खजिनदार श्री. तुषार रंजनकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे प्रकल्प अधिकारी सागर कांबळे यांनी केले.
