वृक्ष संजीवनी परिवाराच्या सायराभाभी अत्तार यांच्या पुढाकाराने विवाह मंडपातून येऊन चिरंजीव यतीन व कोकण कन्या मीनल या वधुवरांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी स्थळावरती पर्यावरण दिनी वृक्षारोपण केले .या नव्या परंपरेमुळे वृक्ष संजीवनी परिवाराच्या सायराभाभी आत्तार व गांधले परिवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .पर्यावरण दिनानिमित्त अनेक संस्थांनी एकत्र येऊन रॅली काढून वृक्षारोपण केले .
इंदापूर या ठिकाणी गेल्या वर्षामध्ये हजारो वृक्ष लावून नवीन विक्रम करणाऱ्या वृक्ष संजीवनी परिवारांने पुढाकार घेऊन आज पाच जून 2025 रोजी पर्यावरण दिनानिमित्त इंदापूर शहरातून भव्यअशी वृक्ष दिंडीची रॅली काढली . या रॅलीमध्ये शहरातील हजारो नागरिक सहभागी होते गेल्या वर्षी 5 जून 2024 रोजी इंदापूर शहर हरित करण्यासाठी वृक्ष संजीवनी परिवाराची स्थापना झाली या परिवाराने सुमारे पाच हजार झाडे लावली व या झाडाचे संगोपन करण्याचा प्रयत्न केला आज पर्यावरण दिन होता या निमित्त वृक्ष संजीवनी परिवार इंदापूर नगरपरिषद युवा क्रांती प्रतिष्ठान ,जय नर्सिंग इन्स्टिट्यूट, पतंजली योग समिती , शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट ,चंदुकाका सराफ अशा अनेक संस्थांनी एकत्र येऊन पर्यावरण दिन साजरा केला . इंदापूर नगरपालिके समोरील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पर्यावरण जोपासण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये हजारो इंदापूरकर नागरिक सहभागी झाले ही रॅली जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीतळावरती गेल्यानंतर या परिसरामध्ये वृक्षाचे रोपण करण्यात आले .
याप्रसंगी आज चिरंजीव यतीन गांधले व कोकण कन्या मीनल यांचा शुभविवाह होता गांधले कुटुंब हे पुरोगामी विचाराचे असल्यामुळे त्यांनी पर्यावरण दिनानिमित्त आधी वृक्षारोपण नंतर विवाह करण्याचा निर्णय घेतला हे नवदांपत्य विवाहाचा मुहूर्त एक वाजून 45 मिनिटांचा असताना त्यापूर्वी पालखीतळावरती आले व त्यांनी वृक्षारोपण केले यावेळी वर यतीन गांधले यांनी संबोधित करताना म्हणाले की माणसाला आपले आयुष्य वाढवायचे असेल तर वृक्षारोपण केले पाहिजे प्रत्येक माणसाने आयुष्यात असंख्य वृक्ष लावून त्याची जोपासना केली पाहिजे तेव्हा उष्णतामान कमी होऊन पृथ्वीचे व मानव जातीचे आयुष्य वाढेल .
यामधे युवा क्रांती प्रतिष्ठान, जय नर्सिंग इस्टीट्यूट , इंदापूर मेडिकल असोशिएसन, अखिल भारतीय मराठी पत्रकार, पतंजली योग समिती, चंदुकाका सराफ, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उत्सव समिती, नागरी संघर्ष समिती, सायकल क्लब, संकल्प मानव सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी सायरा आत्तार, डॉ .कल्पना खाडे , पी . आय खंडागळे' कॉन्स्टेबल माधुरी लडकत , मा . नगराध्यक्षा अलका ताटे, डॉ प्रतिभा वणवे, नगर परिषदेच्या रश्मी बारस्कर,लता नायकुडे, रोहिणी शिंदे, वर्षा शिंदे , रश्मी निलाखे . माधुरी मंदरे, माधवी सोननीस , जाधव मॅडम , रेश्मा शेख ,
नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक स्वपील हाके ,दतात्रय गुजर सर प्रा कृष्णा ताटे, प्रा अरविंद गारटकर, संदिपान कडवळे, धरमचंद लोढा, चंद्रकांत देवकर प्रशांत सिताप, अशोक चिंचकर हरीदास सामसे, महादेव चव्हाण सर, हमीद आत्तार, जयवंत नायकुडे, भारत बोराटे, हाजी सलीमभाई बागवान, ॲड केकान. कुशाल कोकाटे, सागर कांबळे , महिला भगीनी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते .
सर्वांचे स्वागत वृक्ष संवर्धन समितीचे सायरा आत्तार यांनी केले
यावेळी सर्व संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक यांनी पालखीतळावरती 75 झाडांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन करण्याची शपथ घेतली .
