इंदापूर, डॉ. संदेश शहा
आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान तसेच स्व. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ट्रस्टच्या सभागृहात महिलांचे सौंदर्य आणि आरोग्य संवर्धन या विषयावर उद्या शनिवारी दिनांक ७ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता मोफत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठानच्या संचालिका स्वर्गीय डॉ. राधिका संदेश शहा यांच्या पुण्यस्मृती निमित्त या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचा शुभारंभ ट्रस्टचे विश्वस्त अरविंद गारटकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयतेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक भीमराव वणवे सर भूषविणार आहेत. यावेळी पुणे येथील डॉ. विकास ओझर्डेकर हे कॅन्सर, मधुमेह तसेच इतर आजार रोखण्यासाठी मिलेट थेरपी ( भरडधान्य ) तर ब्ल्यू जय कंपनीचे प्रतिनिधी प्रवीण जाधव हे स्वयंपाक घरातून आरोग्य संवर्धन या विषयी मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी अकलूज येथील डॉ. संतोष काटकर हे महिलांचे सौंदर्य संवर्धन या विषयावर मार्गदर्शन आहेत. यानिमित्त विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. यानिमित्त माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा, मैत्रीण ग्रुप च्या संस्थापिका सौ. अनुराधा प्रदीप गारटकर, लिनस क्लबच्या अध्यक्षा सौ. उज्वला प्रकाश गायकवाड, महिला बचत गटासाठी प्रभावी काम करणाऱ्या सौ. निलोफर रज्जाक पठाण, सकाळ मधुरांगण च्या तालुका प्रतिनिधी सौ. सारिका पवार यांना गौरविण्यात येणार असून हा कार्यक्रम दोन विनामूल्य आहे. यातून महिलांना घरबसल्या आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य व सौंदर्य संवर्धन करण्याबरोबरच अर्थार्जन करण्याची देखील संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठान व ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
